Shatrughan Sinha Hospitalised: शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल; सोनाक्षी-झहीरने घेतली भेट

शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लवने सांगितले की, त्याला व्हायरल तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाहण्यासाठी सोनाक्षी आणि झहीरही हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

Shatrughan Sinha (PC - ANI)

Shatrughan Sinha Hospitalised: काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची कार हॉस्पिटलबाहेर पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नानंतर 6 दिवसांनी अचानक हे जोडपे हॉस्पिटलबाहेर दिसले, असे काय घडले असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता त्याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लवने सांगितले की, त्याला व्हायरल तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाहण्यासाठी सोनाक्षी आणि झहीरही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पापा गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ताप आणि अशक्तपणाने त्रस्त होते, त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून डॉक्टर त्यांची तपासणी करू शकतील आणि त्यांच्यावर योग्य उपचार करू शकतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement