Jee Rahe The Hum Song Out: पूजा हेगडेच्या प्रेमात पडला सलमान खान; 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील नवीन गाणं 'जी रहे थे हम' प्रदर्शित, Watch

गाण्याचा टीझर शेअर करताना त्याने सांगितले की, 'फॉलिंग इन लव्ह' 21 मार्चला रिलीज होत आहे. आता अभिनेत्याने हे गाणे रिलीज केले आहे.

Jee Rahe The Hum Song Out (PC- You Tube)

Jee Rahe The Hum Song Out: सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'पठाण' सोबतच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. सलमान खानने 'किसी का भाई किसी की जान' मधील 'रहे थे हम' ('फॉलिंग इन लव्ह') गाण्याचे अपडेट दिले होते. गाण्याचा टीझर शेअर करताना त्याने सांगितले की, 'फॉलिंग इन लव्ह' 21 मार्चला रिलीज होत आहे. आता अभिनेत्याने हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात सलमान खान आणि पूजा हेगडे यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. 'फॉलिंग इन लव्ह'मध्ये दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्यात भाईजान एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे, जो गाण्यात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)