Saif Ali Khan Hospitalised: सैफ अली खान हॉस्पिटल मध्ये दाखल - मीडीया रिपोर्ट्स
अनेक दिवस ही शस्त्रक्रिया करायची होती पण आता त्याची वेळ नक्की झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेता सैफ अली खान हॉस्पिटल मध्ये दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई मध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये तो दाखल असून त्याला फ्रॅक्चर असल्याने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. यामध्ये अद्याप सैफच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 53 वर्षीय सैफ वर यापूर्वी देखील लहान मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही शस्त्रक्रिया देखील फार गंभीर नाही. अनेक दिवस ही शस्त्रक्रिया करायची होती पण आता त्याची वेळ नक्की झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. Devara Part 1 Teaser: ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा'चा दमदार टीझर रिलीज, 5 एप्रिलला होणार. सिनेमागृहात दाखल
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)