Rehnaa Hai Terre Dil Mein: तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'रहना है तेरे दिल में'; जाणून घ्या कधी
त्याची गाणीही प्रचंड गाजली. आता 23 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
Rehnaa Hai Terre Dil Mein To Re-Release in Theatres: या वर्षी, अनेक क्लासिक कल्ट बॉलीवूड चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाले. सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर हम आपके है कौन आणि तृप्ती दिमरी स्टारर लैला मजनू या चित्रपटांना पुन्हा थिएटरमध्ये खूप प्रेम मिळाले. आता आणखी एक चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. रहना है तेरे दिल में 2001 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मिनाले या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. पूजा एंटरटेनमेंटने मंगळवारी चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. रहना है तेरे दिल में हा चित्रपट यावर्षी 30 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होत आहे. अशाप्रकारे रहना है तेरे दिल में या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि ते आजपर्यंत कायमअसल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Home मनोरंजन बॉलिवूड ‘Border 2’: 'बॉर्डर 2' चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री, सनी देओल करणार दिग्दर्शन)
पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'रहना है तेरे दिल में'-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)