Ramayana Movie: रामायण सिनेमाच्या सेटवरील रणबीर आणि साई पल्लवीचा लूक समोर

सिनेमाच्या सेटवर फोन आणण्याची बंदी असतानाही हे फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे आता नितेश तिवारी काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Pic Credit - Zoom Insta

रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' (Ramayana) या सिनेमाच्या सेटवरील फोटो पुन्हा एकदा लीक झाले आहे. झूम टीव्ही चॅनेलने नुकतचं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रणबीर आणि साई पल्लवीचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ते दोघं सिनेमातील एक सीनचं शूट करत असून त्यांच्या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.  सोशल मीडियावर सेटचे फोटो व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत या फोटोचं कौतुक केलं. सिनेमाच्या सेटवर फोन आणण्याची बंदी असतानाही हे फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे आता नितेश तिवारी काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now