Prime Video ने नवीन मालिका ‘Half Pants Full Pants’च्या ट्रेलरचे केले अनावरण, Sonali Kulkarni प्रमुख भूमिकेत
ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या बालपणातील आनंदी क्षणांची आठवण करून देईल. ही मालिका एका लहान मुलाच्या निष्पाप विश्वाची झलक तर दाखवतेच, शिवाय, लहान मुले विरुद्ध मोठी माणसे अशा वैश्विक कथेचेही दर्शन घडवते.
Half Pants Full Pants Trailer: प्राइम व्हिडिओने (Prime Video) त्यांच्या हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स (Half Pants Full Pants) या सर्वांनी बघाव्याच अशा आगामी हलक्याफुलक्या ड्रामेडीचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या बालपणातील आनंदी क्षणांची आठवण करून देईल. ही मालिका एका लहान मुलाच्या निष्पाप विश्वाची झलक तर दाखवतेच, शिवाय, लहान मुले विरुद्ध मोठी माणसे अशा वैश्विक कथेचेही दर्शन घडवते. आनंद सुप्सी यांच्या त्याच नावाच्या पुस्तकावरून घेतलेल्या या मालिकेची निर्मिती ओएमएल स्टुडिओजने केली आहे, तर व्ही. के. प्रकाश यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. या मालिकेत अश्वंथ अशोककुमार, आशीष विद्यार्थी, सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) व कार्तिक विजन (Karthik Vijan) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स ही मालिका 16 डिसेंबर 2022 रोजी भारतात व जगभरातील 240 देश-प्रदेशांमधील जागतिक प्रीमियरसाठी सज्ज आहे.
पहा ट्रेलर
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

