RC15 च्या सेटवर प्रभूदेवा आणि क्रूकडून रामचरणचे हटके स्वागत (Watch Video)
राम चरणने हैदराबादमध्ये RC15 या चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभूदेवा आणि त्याच्या क्रूने हटके पद्धतीने राम चरणचे सेटवर स्वागत केले.
RRR चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे सेलिब्रेशन अजुनही देशभरात सुरु आहे. RRR चित्रपटातील अभिनेता रामचरण (Ram Charan) आता पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात करत आहे. राम चरणने हैदराबादमध्ये RC15 या चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभूदेवा (Prabhudeva) आणि त्याच्या क्रूने हटके पद्धतीने राम चरणचे सेटवर स्वागत केले.
राम चरने याचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला असून यामध्ये प्रभूदेवा आणि त्याचा RC15 या चित्रपटाचा संपुर्ण क्रू हा RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या सरप्राईज नंतर अभिनेता रामचरण भारावून गेला असून त्यांने प्रभूदेवा आणि संपुर्ण क्रुचे आभार मानले.
पहा व्हिडिओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2023 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

