Prabhas New Movie: रामाच्या नंतर आता शंकराच्या भूमिकेत दिसणार सुपरस्टार प्रभास, विष्णू मंचूचा ड्रीम प्रोजेक्ट
'कन्नप्पा' चित्रपटात प्रभास भूमिका साकारणार असल्याचे वृत्त साऊथ स्टार विष्णू मंचूने ट्विट करत शेअर केले आहे. खरंतर हा चित्रपट विष्णू मंचूचा ड्रीम प्रोजेक्ट आहे
आदिपुरुषनंतर सुपरस्टार प्रभासचा 'सालार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्याच्या 28 तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणाने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान प्रभासच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भगवान श्रीरामाची भूमिका साकारल्यानंतर प्रभास आता भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने हा चित्रपट साइन देखील केला आहे. 'कन्नप्पा' चित्रपटात प्रभास भूमिका साकारणार असल्याचे वृत्त साऊथ स्टार विष्णू मंचूने ट्विट करत शेअर केले आहे. खरंतर हा चित्रपट विष्णू मंचूचा ड्रीम प्रोजेक्ट आहे
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)