Kishore Kumar Birth Anniversary: किशोर कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने खास शुभेच्छा देत चाहत्यांना केला प्रश्न; म्हणाला, किशोर कुमार यांचे तुमचे आवडते गाणे कोणते आहे?
संगीताचे औपचारिक प्रशिक्षण न घेताही किशोर कुमार यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवून लोकांना संगीताशी जोडले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खास पोस्ट शेअर करत किशोर कुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Kishore Kumar Birth Anniversary: बॉलिवूडचे गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा आज वाढदिवस आहे. 4 ऑगस्ट 1929 रोजी जन्मलेले हे अष्टपैलू कलाकार आता आपल्यात नाहीत. पण त्यांचा अप्रतिम आवाज आणि अप्रतिम अभिनय कौशल्याने ते त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. संगीताचे औपचारिक प्रशिक्षण न घेताही किशोर कुमार यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवून लोकांना संगीताशी जोडले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खास पोस्ट शेअर करत किशोर कुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चाहत्यांना किशोर कुमार यांचे कोणते गाणे तुम्हाला आवडते? असा प्रश्न केला आहे. अनेकांनी सचिनला कमेन्ट बॉक्समध्ये किशोर कुमार यांचं फेव्हरिट गाणं सांगितलं आहे.
Kishore da’s voice travels straight to the heart. Happy birthday to the maestro!
What’s your favourite #KishoreKumar song? pic.twitter.com/bVj0u6f6fP
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2023 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

