Nawazuddin Siddiqui आपल्या आजारी आईला गेला होता भेटायला, पण भावाने दिली नाही परवानगी; अभिनेता न भेटताच परतला (Watch Video)

अभिनेत्याच्या आईची प्रकृती ठीक नाही. तिला कोणालाही भेटायचे नाही.

Nawazuddin Siddiqui

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे (Nawazuddin Siddiqui) वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेचा विषय आहे. एकीकडे नवाजुद्दीनच्या पत्नी आलियासोबतच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. त्याचवेळी त्याचा भावासोबतचा लढा जगजाहीर होत आहे. काल रात्री नवाजुद्दीन सिद्दीकी आईला भेटण्यासाठी वर्सोवा येथील बंगल्यावर पोहोचला होता, मात्र त्याच्या भावाने त्याला आईला भेटण्यापासून रोखले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या आईला भेटायचे होते, पण त्याचा भाऊ आणि आईचे केअरटेकर त्याला जाऊ देत नव्हते. अभिनेत्याच्या आईची प्रकृती ठीक नाही. तिला कोणालाही भेटायचे नाही. याच कारणामुळे नवाजला त्याच्या आईला भेटण्यापासून रोखण्यात आले होते. नवाज जेव्हा वर्सोव्याच्या बंगल्यावर पोहोचला तेव्हा त्याच्या भावाने त्याला आत जाऊ दिले नाही.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif