Mukesh Khanna on The Film 'Adipurush': 'आदिपुरुष'ला मुकेश खन्ना यांचा आक्षेप; म्हणाले 'जर हे थांबवले नाही, तर मला वाटेल की 100 कोटी हिंदू अजून जागे झालेच नाहीत'

आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या चित्रपटाबाबत लोक विविध मार्गांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Mukesh Khanna (Photo Credit - Twitter)

आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या चित्रपटाबाबत लोक विविध मार्गांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आता या यादीत शक्तीमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. खन्ना यांनी आदिपुरुष चित्रपटाचे वर्णन रामायणाचा सर्वात मोठा आणि भयानक तमाशा म्हणून केले आहे. यासोबतच त्यांनी ओम राऊत आणि मनोज मुंतशीर यांनाही खडसावले. एनआयशी बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, ‘या चित्रपटाला माझा मोठा आक्षेप आहे. या चित्रपटाला विरोध हा झालाच पाहिजे. जर देशातील लोकांनी हे थांबवले नाही, तर मला वाटेल की 100 कोटी हिंदू अजून जागे झालेच नाहीत.’ (हेही वाचा:  'कोणालाही कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही'; आदिपुरुष वादावर Minister Anurag Thakur यांची प्रतिक्रिया)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement