Mithun Chakraborty to Receive Dadasaheb Phalke Award: भारतीय चित्रपटसृष्टीतील 'आयकॉनिक' योगदानासाठी मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Mithun Chakraborty | (File Image)

Mithun Chakraborty to Receive Dadasaheb Phalke Award: जेष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी गेली अनेक दशके लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता 74 वर्षीय अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X खात्यावरील पोस्टमध्ये लिहिले, ‘मिथुन दा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास प्रत्येक पिढीला प्रेरणा देतो! दादासाहेब फाळके निवड ज्युरीने दिग्गज अभिनेते, श्री मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.’

येत्या 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मिथुन यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1977 मध्ये आलेल्या 'मृग्या' चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले. (हेही वाचा: Dhoom 4: रणबीर कपूर आणि धूम 4? मग अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा यांचे काय?)

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)