Mirg Trailer: राज बब्बर आणि सतीश कौशिक स्टारर 'मिर्ग'चा ट्रेलर रिलीज, 9 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

ऋषी आनंद, तरुण शर्मा आणि श्वेताभ सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट स्टुडिओ आरएने नामा प्रॉडक्शन आणि वन शॉट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला आहे

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक (Veteran actor Satish Kaushik) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'मिर्ग' (Mirg) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो 9 फेब्रुवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटामध्ये सतीश कौशिक व्यतिरिक्त राज बब्बर, (Raj Babbar) अनुप सोनी (Anup Soni) आणि श्वेताभ सिंग (Shwetabh Singh) मुख्य भूमिकेत आहेत.  तरुण शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहली असून दिग्दर्शन केले आहे. ऋषी आनंद, तरुण शर्मा आणि श्वेताभ सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट स्टुडिओ आरएने नामा प्रॉडक्शन आणि वन शॉट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement