Ayesha Hanif Debunks Death Rumours: 'Mera Dil Ye Pukare Aaja' गाण्यामुळे व्हायरल झालेल्या आयशा हनीफ हिच्या मृत्यूचा दावा निराधार

एका पार्टीमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र, स्वत: आयशा हनिफ हिनेच हा दावा खोडून काढला आहे.

"मेरा दिल ये पुकारे आजा" (Mera Dil Ye Pukare Aaja) गाण्यामुळे टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आयशा हनिफ हिच्या कथीत मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. एका पार्टीमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र, स्वत: आयशा हनिफ हिनेच हा दावा खोडून काढला आहे. दरम्यान, आयशा नावाच्या आणखी एका टिकटॉक स्टारचा मृत्यू झाल्याचे समजते. नावातील साधर्म्यामुळे चाहते आणि युजर्सची गफलत झाल्याने हा गोंधळ झाल्याचीही चर्चा आता रंगली आहे.

आयशा हनीफ ही पंजाबमधील शेखुपुरा शहरातील एक टिकटॉक स्टार आहे. या बातमीत एकच सत्य आहे की आयेशाचा मृत्यू झाला आहे. मात्र, निधन झालेल्या आयेशा हनीफ नसून आयेशा मानो आहे. दोघांचे नाव एकच आहे, त्यामुळेच आयशा मानोच्या मृत्यूची बातमी वेगवेगळ्या ठिकाणी पसरली आहे. मात्र, श्रद्धांजली म्हणून लोक सोशल मीडियावर आयशा हनीफ हिचे फोटो शेअर करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)