Sreenath Bhasi Arrested: मुलाखतीदरम्यान अँकरला शिवीगाळ केल्याप्रकरणी मल्याळम अभिनेता श्रीनाथ भासीला अटक

ऑनलाइन मीडियामध्ये काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराने गेल्या आठवड्यात झालेल्या मुलाखतीदरम्यान शाब्दिक गैरवर्तनाची तक्रार केली होती.

Sreenath Bhasi (PC - ANI)

Sreenath Bhasi Arrested: मल्याळम चित्रपट अभिनेता श्रीनाथ भासी याला सोमवारी माराडू पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर मुलाखतीदरम्यान एका महिला पत्रकारावर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ऑनलाइन मीडियामध्ये काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराने गेल्या आठवड्यात झालेल्या मुलाखतीदरम्यान शाब्दिक गैरवर्तनाची तक्रार केली होती.

भासी यांनी रेडिओ जॉकी म्हणून मीडियामधील करिअरची सुरुवात केली आणि नंतर ते व्हिडिओ जॉकी बनले. 2011 मध्ये, ब्लेसी दिग्दर्शित आणि मोहनलाल आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या प्राणायाम या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी आतापर्यंत जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)