Maharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात Sachin Tendulkar आणि Shah Rukh Khan यांनी घेतली एकमेकांची गळाभेट, पहा Video

महाराष्ट्रात अखेर नवीन सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Shah Rukh Khan and Sachin Tendulkar share Hug

Maharashtra CM Oath Ceremony: भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला एनडीएच्या दिग्गजांसह अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसह उपस्थित होता. क्रिकेटशिवाय बॉलिवूड जगतातील दिग्गज मंडळीही तेथे होती. ज्यामध्ये आवर्जून नमूद करावे असे नाव म्हणजे शाहरुख खान. आता शाहरुख खानचा सचिन तेंडुलकरसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शपथविधी सोहळ्यावेळी सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या सोहळ्यात शाहरुख खान आणि सचिन एकत्र बसले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात अखेर नवीन सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (हेही वाचा: मुंबईमध्ये Devendra Fadnavis यांनी घेतली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ; सोहळ्याला शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दीक्षितसह अनेक सेलेब्जनी लावली हजेरी)

सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान यांनी घेतली गळाभेट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now