Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection: ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
या चित्रपटाने दोन दिवसात देशभरातून एकूण कलेक्शन 41.56 कोटी झालं आहे.
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल असा अंदाज होता. मात्र तसं काहीही झालं नाही. पहिल्या दिवशी भारताततून फक्त 15 कोटींची कमाई (Box Office Collection) केली. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने चांगली कामगिरी करत या चित्रपटाने 25.75 कोटींचा गल्ला जमावला. पहिल्या दिवशीच्या मानाने दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने दहा कोटी अधिक कमावले. तर आता या चित्रपटाचं देशभरातून एकूण कलेक्शन 41.56 कोटी झालं आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी याबद्दलची ट्विटरवर माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)