Kiccha Sudeep च्या आगामी Kabzaa चित्रपटाचा दमदार Teaser प्रदर्शित, 7 भाषामध्ये होणार रिलीज
'कबजा' या चित्रपटात किच्चा सुदीपशिवाय अभिनेता उपेंद्रही (Upendra) मुख्य भूमिकेत आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबती याने या चित्रपटाच्या टीझरचे अनावरण केले आहे.
साउथ सिनेमाचा सुपरस्टार किच्चा सुदीपची (Kiccha Sudeep) लोकप्रियता खूप जास्त आहे. साऊथ इंडस्ट्रीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकही सुदीपच्या चित्रपटांसाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, किच्चा सुदीपच्या आगामी 'कबजा' (Kabzaa) या चित्रपटाचा टीझर (Teaser) रिलीज झाला आहे. 'कबजा' या चित्रपटात किच्चा सुदीपशिवाय अभिनेता उपेंद्रही (Upendra) मुख्य भूमिकेत आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबती याने या चित्रपटाच्या टीझरचे अनावरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कबजा हा चित्रपट 7 भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ज्यामध्ये हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू, ओरिया आणि मराठी भाषांचा समावेश आहे. या चित्रपटात किच्चा सुदीप आणि उपेंद्र यांच्याशिवाय साऊथची सुपरस्टार श्रिया सरनही (Shriya Saran) मुख्य भूमिकेत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)