Kareena Kapoor Khan Pregnant Again? करीना ने तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या अफवांचे केले खंडन; म्हणाली- 'इट्स द पास्ता अँड वाईन गाईज

करीना कपूर खानने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे पती सैफ अली खानसोबत पुन्हा गरोदर असल्याच्या अफवांचे खंडन केले.

Kareena Kapoor (File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानच्या लंडन ट्रीपचा एका फोटो नुकताच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याचे सोशल मिडियावर म्हटले गेले. यावरून करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. आता करीना कपूर खानने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे पती सैफ अली खानसोबत पुन्हा गरोदर असल्याच्या अफवांचे खंडन केले. तिने अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेतला.

तिने लिहिले आहे, - 'कदाचित पास्ता आणि वाईनमुळे माझे पोट तसे दिसत असावे...शांत व्हा... मी प्रेग्नंट नाही... उफ्फफ... सैफ म्हणतो की त्याने आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये आधीच खूप योगदान दिले आहे. मी गरोदर असल्याची फक्त अफवा आहे.' अशा प्रकारे करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्यांवर पडदा पडला आहे.

करीना कपूर इंस्टाग्राम स्टोरी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)