‘Indian 2’ OTT Release Date: कमल हसन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट इंडियन 2 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
कमल हसन आणि शंकर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट इंडियन २ लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. या अॅक्शन चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीज होऊन एक महिना झाला आहे.
‘Indian 2’ OTT Release Date: कमल हसन आणि शंकर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट इंडियन २ लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. या अॅक्शन चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीज होऊन एक महिना झाला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध असेल. चित्रपटात कमल हसन यांनी भ्रष्टाचाराविरुध्द लढा देणाऱ्या वृध्द स्वातंत्र्य सैनिक कमांडरची भूमिका साकरली आहे. चित्रपटात सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, एसजे सूर्या आणि प्रिया भवानी शंकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता OTT प्लॅटफॉर्मवरील हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहायचे आहे. (हेही वाचा-'द यूपी फाइल्स' सिनेमाने एकाच आठवड्यात जमावला 16 कोटींचा गल्ला)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

