Kajol's Mom Actress Tanuja Hospitalised: काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

अभिनेत्री तनुजाच्या तब्येतीचे अपडेट समोर येताच, लोक तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. 80 वर्षीय तनुजा मुखर्जी यांना आज वयाशी संबंधित समस्यांमुळे जुहूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Kajol's Mom Actress Tanuja (PC - Twitter/@FilmyMonkey)

Kajol's Mom Actress Tanuja Hospitalised: चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काजोल-तनिषा मुखर्जीची (Kajol-Tanisha Mukherjee) आई आणि ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री तनुजा लहानपणापासूनच भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. अभिनेत्रीच्या दोन लाडक्या मुली काजोल आणि तनिषा मुखर्जी देखील अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत. अभिनेत्री तनुजा हिला रविवारी संध्याकाळी वयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तनुजा सध्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

अभिनेत्री तनुजाच्या तब्येतीचे अपडेट समोर येताच, लोक तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. 80 वर्षीय तनुजा मुखर्जी यांना आज वयाशी संबंधित समस्यांमुळे जुहूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Shreyas Talpade: Welcome 3 चित्रपटातून मोठी अपडेट समोर, श्रेयस तळपदे सिनेमातून बाहेर?)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement