Do Patti: क्रिती सेनन आणि काजोल स्टारर 'दो पट्टी'चे शूटिंग झाले पूर्ण, पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
ब्लू बटरफ्लाय फिल्म्स या त्यांच्या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली त्यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनन यांच्या आगामी 'दो पत्ती' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शूटिंगमागचे सुंदर क्षण तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करून क्रितीने ही बातमी जाहीर केली आहे. या रहस्यमय थ्रिलर चित्रपटासाठी, दोन्ही सुपरस्टार्सनी बर्फाच्छादित पर्वत आणि मनालीच्या चित्तथरारक ठिकाणी भरपूर परिक्षम केले आहे. या चित्रपटात काजोल आणि क्रितीशिवाय शाहिद शेखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)