Tehran: जॉन अब्राहम पुन्हा दिसणार अॅक्शन अवतारात, शेअर केले त्याच्या नवीन चित्रपट 'तेहरान'चे पोस्टर

पोस्टर पाहता जॉन यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढताना दिसणार असल्याचे दिसते. हा चित्रपट फुल अ‍ॅक्शन असणार असल्याची माहिती खुद्द जॉननेच दिली आहे.

Tehran Movie (Photo Credit - Insta)

बॉलिवूडचा अॅक्शन किंग जॉन अब्राहम (Johan Abraham) सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्शन चित्रपट (Action Movie) करताना दिसतो. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या 'Attack' या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांना खूप आवडले आहे. जॉनचा नवा अवतार सर्वांनाच पाहायला मिळत आहे. दरम्यान, जॉनने आणखी एक धमाका केला आहे. जॉनने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे. 'तेहरान' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात जॉनही अॅक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. पोस्टर पाहता जॉन यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढताना दिसणार असल्याचे दिसते. हा चित्रपट फुल अ‍ॅक्शन असणार असल्याची माहिती खुद्द जॉननेच दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)