Fateh Release Date: बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'फतेह' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सोनू सूदने पोस्टरमध्ये लिहले की, 'फतेह' देशातील सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज आहे. त्याच बरोबर चित्रपटच्या रिलीजची डेट देखील लिहली आहे. पोस्टरवरील जॅकलिन फर्नांडिसचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहे. 'फतेह' चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (हेही वाचा- उर्वशी रौतेलाच्या एमएमएस वादात, अभिनेत्रीचे हॉट आणि सेक्सी फोटो आले समोर)
SONU SOOD TURNS DIRECTOR WITH ‘FATEH’: RELEASE DATE ANNOUNCEMENT… NEW POSTERS OUT NOW… On his birthday today, #SonuSood announces the release date of his directorial debut #Fateh: In *cinemas* 10 Jan 2025.#Fateh - the action-thriller - also features #NaseeruddinShah and… pic.twitter.com/axiiP9Z82R
— taran adarsh (@taran_adarsh) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)