'भारतरत्न आदरणीय लतादीदी यांना लवकर आराम पडो अशी मी प्रार्थना करतो'- Devendra Fadnavis

गेल्या काही दिवसांपासून भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती आहेत

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

गेल्या काही दिवसांपासून भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज संध्याकाळी बातमी आली होती की लता मंगेशकर यांची तब्येत खालावली आहेत. त्यानंतर राज ठाकरे, पियुष गोयल अशी अनेक राजकीय मंडळी लता दीदींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'भारतरत्न आदरणीय लतादीदी यांना लवकर आराम पडो, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now