Hrithik Roshan आणि Saif Ali Khan यांच्या 'Vikram Vedha'चा Teaser रिलीज
या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे, तसेच हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. अॅक्शनने भरलेल्या दृश्यांसह प्रेक्षकांसाठी एक सुखद सरप्राईज म्हणून चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. टीझरमध्ये अॅक्शन सीनची झलकही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या 2017 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आर. माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे आणि एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)