Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' वेब सीरिजच्या स्टारकास्टची घोषणा; सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत आरजे मलिष्का
मुहम्मद अली जिना यांचे जवळचे सहकारी लियाकत हे फाळणीच्या वाटाघाटींमधील एक महत्त्वाचे नेते होते मात्र पंतप्रधान म्हणून त्यांना विदारक शेवटाला सामोरे जावे लागले. यातील प्रत्येक व्यक्तीमत्त्वाने भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय पटलावर कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे.
‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या राजकीय थरारनाट्यामध्ये मलिष्का मेन्डोसा सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या काळामध्ये सरोजिनी नायडू, व्हीपी मेनन आणि लियाकत अली खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चळवळीमधील एक ठळक स्त्री नेतृत्व असलेल्या नायडू यांनी भारताच्या मुक्ततेचा पुरस्कार केला तसेच त्या आपल्या कवितांसाठी तसेच आंदोलनातील सहभागासाठीही ओळखल्या जातात. मेनन यांनी घटनात्मक सल्लागार म्हणून संस्थानांना स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मुहम्मद अली जिना यांचे जवळचे सहकारी लियाकत हे फाळणीच्या वाटाघाटींमधील एक महत्त्वाचे नेते होते मात्र पंतप्रधान म्हणून त्यांना विदारक शेवटाला सामोरे जावे लागले. यातील प्रत्येक व्यक्तीमत्त्वाने भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय पटलावर कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे.
पाहा पोस्ट -