Runway 34 Song Mitra Re: 'रनवे 34' चे पहिले गाणे 'मित्रा रे' रिलीज, वाढदिवसानिमित्त अजय देवगण झाला भावूक
'रनवे 34'च्या निर्मात्यांनी अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे.
Runway 34 Song Mitra Re: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. सकाळपासूनच अभिनेत्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय 'रनवे 34'च्या निर्मात्यांनी अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. 'मीत्रा रे...' असे या गाण्याचे बोल आहेत. जे अरिजित सिंग आणि जसलीन रॉयल यांनी गायले आहे. अजयनेही हे गाणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'तेरा भी तो खुदा है #मित्रारे गाणे आऊट नाऊ.' पहा चित्रपटातील गाणे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)