Pathaan: 'पठाण' चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक शेअर, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
शाहरुख आणि दीपिकाचा लूक आधीच रिलीज झाला आहे, आता अभिनेता जॉन अब्राहमचा लूकही समोर आला आहे.
यशराज फिल्म्सचा आणखी एक बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठाण' रिलीज होण्यास अवघे पाच महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत निर्माते हळूहळू चित्रपटाशी संबंधित गोष्टी समोर आणत आहेत. शाहरुख आणि दीपिकाचा लूक आधीच रिलीज झाला आहे, आता अभिनेता जॉन अब्राहमचा लूकही समोर आला आहे. ज्यामध्ये नेहमीप्रमाणे जॉन डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत आहे. अभिनेत्याची एंट्री धमाकेदार आहे परंतु सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे जॉनला आतापर्यंतच्या सर्वात सुपर स्लीक अवतारात सादर करण्यात आले आहे. 'पठाण' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 23 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ हिंदीतच नाही तर तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)