Aditya Narayan Hit Fan In A Concert: आधी माईक मारला.., मग फोन हिसकावून फेकला; आदित्य नारायणने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केले चाहत्याशी गैरवर्तन (Watch Video)
आदित्य नारायणला एका चाहत्यावर राग आला आणि त्याने चाहत्यावर हल्ला केला. स्टेजवर गाण गाताना त्याने प्रथम चाहत्याच्या हातावर माइक मारला, नंतर त्याचा फोन हिसकावून तो फेकून दिला. ज्या तरुणावर आदित्यने राग काढला तो म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान आदित्य नारायणचा व्हिडिओ बनवत होता. पण, आदित्यला हे आवडले नाही आणि त्याने त्याच्या चाहत्यावर हल्ला केला.
Aditya Narayan Hit Fan In A Concert: गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) त्याच्या रागामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा त्याने असे काही केले आहे ज्यामुळे तो सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. आदित्य नारायणचा हा व्हिडिओ एका कॉन्सर्टचा आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला मारण्याचा प्रयत्न करत आणि फोन फेकताना दिसतोय. या व्हिडिओमुळे आदित्य नारायण पुन्हा एकदा ट्रोल्सच्या कचाट्यात आला आहे. या वीकेंडला आदित्यने छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महाविद्यालयीन कार्यक्रमात भाग घेतला. यादरम्यान आदित्य नारायणला एका चाहत्यावर राग आला आणि त्याने चाहत्यावर हल्ला केला. स्टेजवर गाण गाताना त्याने प्रथम चाहत्याच्या हातावर माइक मारला, नंतर त्याचा फोन हिसकावून तो फेकून दिला. ज्या तरुणावर आदित्यने राग काढला तो म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान आदित्य नारायणचा व्हिडिओ बनवत होता. पण, आदित्यला हे आवडले नाही आणि त्याने त्याच्या चाहत्यावर हल्ला केला. आदित्यची ही कृती पाहून सोशल मीडिया यूजर्सकडून संताप व्यक्त होत आहे.ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, आदित्य नारायण कॉन्सर्ट दरम्यान शाहरुख खानच्या डॉन चित्रपटातील 'आज की रात' गाणे सादर करताना दिसत आहे. (वाचा - Kartik Aaryan ला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून केला 1100 किलोमीटरचा प्रवास, Watch Video)
पहा -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)