Vijay Antony’s Daughter Dies by Suicide: प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनी यांच्या मुलीची चेन्नई येथील राहत्या घरी आत्महत्या
विजय पहाटे 3 वाजता आपल्या मुलीच्या खोलीत गेला तेव्हा तिला ती फासावर लटकलेली दिसली. यानंतर विजय कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. विजयची मुलगी बारावीत शिकत होती. मंगळवारी सकाळपासूनच या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
Vijay Antony’s Daughter Dies by Suicide: दक्षिणेतील मनोरंजन जगतातून सकाळी एक वाईट बातमी येत आहे. रिपोर्ट्सनुसार, साऊथचे प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनी यांची 16 वर्षीय मुलगी लारा अँटोनी हिने आत्महत्या केली आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीच्या आत्महत्येची बातमी विजयला मिळाली. त्यानंतर लाराला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. वृत्तानुसार, विजय पहाटे 3 वाजता आपल्या मुलीच्या खोलीत गेला तेव्हा तिला ती फासावर लटकलेली दिसली. यानंतर विजय कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. विजयची मुलगी बारावीत शिकत होती. मंगळवारी सकाळपासूनच या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)