Viral Video: हैदराबादमध्ये आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये भगवान हनुमानाच्या आरक्षित आसनावर बसलेल्या व्यक्तीला मारहाण

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भगवान हनुमानाच्या आरक्षित आसनावर बसलेल्या व्यक्तीला मारहाण (PC - Twitter)

Viral Video: आज प्रभासचा बहुप्रतिक्षीत आदिपुरुष चित्रपट रिलीज झाला. चित्रपटगृह मालकांनी चित्रपट निर्माते ओम राऊत यांच्या विनंतीनुसार, चित्रपटगृहातील एक सीट भगवान हनुमानासाठी राखीव ठेवलं. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांच्या गर्दीसह स्क्रीनिंग होत असताना, भगवान हनुमानासाठी राखीव असलेल्या आसनावर बसल्याने एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने ही घटना तेलंगणातील हैदराबाद येथील भ्रामरांबा थिएटरमध्ये घडल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा - Adipurush: प्रभास स्टारर आदिपुरुष चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज; दिल्ली, मुंबईत 2,000 रुपयांना विकले जात आहे एक तिकीट- Reports)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)