Drug Case: शाहरुख खानचा मुलगा Aryan Khan, Arbaz Seth Merchant आणि Munmun Dhamecha यांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे
शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ने मुंबईजवळील एका क्रूझवर छापा टाकला. अमली पदार्थांशी संबंधित या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्या एक दिवसाच्या कोठडीनंतर आर्यनला आज, सोमवारी (4 ऑक्टोबर) इतर आरोपींसह न्यायालयात हजर करण्यात आले. आर्यन खानच्या वतीने वकील सतीश मनेशिंदे यांनी त्याच्या जामिनाची मागणी केली होती. आता माहिती मिळत आहे की, आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)