Drug Case: अर्जुन रामपालच्या प्रेयसीचा भाऊ Agisilaos Demetriades ला गोव्यात अटक; ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांची कारवाई

अगिसिलाओस विरुद्ध ही कारवाई PITNDPS कायद्यांतर्गत करण्यात आली आहे

Arjun-Gabriella, Agisilaos Demetraides (Photo Credits: Instagram)

आज, गुरुवारी मुंबई पोलिसांनी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) चा भाऊ दक्षिण आफ्रिकेचा नागरिक अगिसिलाओस डेमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) याला गोव्यातून ताब्यात घेतले. अगिसिलाओस विरुद्ध ही कारवाई PITNDPS कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. अगिसिलाओस हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा समावेश असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. डिमेट्रिएड्सला यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये अंमली पदार्थांच्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या पथकाने गुरुवारी गोव्यातून डेमेट्रिएड्सला ताब्यात घेतले व त्याला मुंबईत आणून आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now