Deepika Padukone, Ranveer Singh Visit Siddhivinayak Temple: दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसोबत दिली मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट; बाळाच्या जन्माआधी घेतले बाप्पांचे आशीर्वाद (Watch Video)
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. दोघांचे मंदिरातील अमेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
Deepika Padukone, Ranveer Singh Visit Siddhivinayak Temple: अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. दीपिकाने नुकतेच तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंगही दिसत होता. या फोटोंमध्ये दीपिका तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. आता आज गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. दोघांचे मंदिरातील अमेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपिका हिरव्या रंगाच्या साडीत रणवीर सिंगसोबत सिद्धिविनायक मंदिरांत पोहोचली आहे. रणवीर आणि दीपिकाभोवती चाहत्यांची गर्दी आहे. दीपिकाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. रणवीर आणि दीपिका व्यतिरिक्त त्यांचे आई-वडील देखील बाप्पाच्या मंदिरात दिसले होते. (हेही वाचा; Deepika Padukone Flaunts Baby Bump: दीपिका पदुकोणने केला बेबी बंप फ्लाँट, पहा फोटोशूट)
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन-
#WATCH | Mumbai: Actors Ranveer Singh and Deepika Padukone offer prayers at Siddhivinayak Temple.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)