Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा काय म्हणाला

त्यानंतर बॉलिवूडकर शाहरुखच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले. यात आता अभिनेता ऋतिक रोशन याची ही भर पडली आहे. त्याने आर्यन खानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. पहा काय म्हणतोय...

Hrithik Roshan & Aryan Khan (Photo Credits: Instagram)

कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापा टाकला आणि त्यात इतरांसह शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. त्यानंतर मागील काही दिवसांपासून यावरुन चर्चा रंगत आहेत. आज आर्यनला न्यायालयात हजर केले जाणार असून आज त्याच्या सुटकेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्यन खानला अटक झाल्यापासून बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला पाठिंबा दर्शवत आहेत. यात आता बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने आर्यन खान च्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिले की, "आर्यनच्या आयुष्यात आलेल्या हा कठीण काळ त्याला चांगली व्यक्ती बनण्यास मदत करेल आणि उद्याचा दिवस सुर्याप्रमाणे उजळेल."

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)