Brahmastra: अयान मुखर्जीनं सांगितला 'ब्रह्मास्त्र'चा दहा वर्षांचा प्रवास; व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

अयानने सांगितले की, ब्रह्मास्त्रचा प्रवास 2011 मध्ये सुरू झाला. त्यादरम्यान माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुसऱ्या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम सुरू होते.

Photo Credit - Twitter

'ब्रह्मास्त्रचा' (Brahmastra) दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने रिलीजपूर्वी या चित्रपटाशी संबंधित काही न ऐकलेल्या पैलूंचा खुलासा केला आहे, ज्या जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. स्टार स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी चित्रपटाबद्दल खास माहिती देताना दिसत आहे. अयानने सांगितले की, ब्रह्मास्त्रचा प्रवास 2011 मध्ये सुरू झाला. त्यादरम्यान माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुसऱ्या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम सुरू होते. त्या काळात मी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये शिमल्यात होतो आणि अध्यात्माच्या खाली ब्रह्मास्त्राचे दर्शन घडले. या चित्रपटाची कथा अशी असेल जी भारतीय चित्रपटसृष्टीत यापूर्वी कधीही पाहिली गेली नसेल. ब्रह्मास्त्र कथेचा पाया आपली संस्कृती, पौराणिक कथा आणि भारतातील अध्यात्म यावर घातला गेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now