Bharat Mata ki Jai By Amitabh Bachchan: India चं नाव आता 'भारत' होत असलेली चर्चा दरम्यान अमिताभ बच्चन यांची समोर आली पहिली प्रतिक्रिया?
Amitabh Bachchan यांनी केलेलं 'भारत माता की जय' हे ट्वीट नक्की कशाकडे इशारा करत आहे याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे.
देशाचं नाव आता 'इंडिया' वरून 'भारत' करण्याच्या तयारीत मोदी सरकार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सरकारच्या या निर्णयावर बीग बी अमिताभ बच्चन देखील रिअॅक्ट झाल्याचं पहायला मिळालं आहे. आज त्यांनी 'भारत माता की जय' असं ट्वीट काही वेळापूर्वी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या नामांतरावर आनंद व्यक्त झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडीयावरही सार्यांना त्याबबात असलेली उत्सुकता दिसत आहे. दरम्यान काही वेळापूर्वी कॉंग्रेस कडून जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर ट्वीट करत हल्लाबोल करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)