ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ची होणार तब्बल 26 दिवसांनंतर सुटका; मन्नत समोर साधू व चाहत्यांची गर्दी (See Photos)
मुंबई क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेला चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आज तुरुंगातून सुटका होणार आहे
मुंबई क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेला चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आज तुरुंगातून सुटका होणार आहे. शुक्रवारी सायंकाळीच त्यांची तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र जामीन आदेश वेळेवर न पोहोचल्याने त्याची काल तुरुंगातून सुटका झाली नाही. स्वत: शाहरुख खान आपल्या मुलाला घेण्यासाठी जेलमध्ये पोहोचला आहे. आर्यन खान तुरुंगातून सुटल्यानंतर 26 दिवसांनी आपल्या घरी परतणार आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.
आर्यन खान घरी येणार असल्याच्या बातमीनंतर 'मन्नत' समोर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी अनेक साधू देखील उपस्थित आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)