Aryan Khan Drug Case: 'किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडून घेतले 50 लाख रुपये'; सॅम डिसूझाचा दावा

गोसावी हा फसवणूक करणारा आहे हे त्याला समजल्यावर त्याने ते पैसे दादलानीला परत केले.

Kiran Gosavi | (Photo Credit Twiiter)

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीची केपी गोसावीशी कथितपणे ओळख करून देणारा सॅम डिसूझा याने अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डिसूझा याने पुष्टी केली आहे की, किरण गोसावीने पूजा ददलानीकडून अंगरक्षकाद्वारे 50 लाख रुपये घेतले होते. डिसोझाने असाही दावा केला आहे की, गोसावी हा फसवणूक करणारा आहे हे त्याला समजल्यावर त्याने ते पैसे दादलानीला परत केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)