काल अफगाणिस्तानविरोधात (Afghanistan) विराट कोहलीनं (Virat Kohli) वादळी शतकी खेळी केली. आशिया चषकात (Asia Cup) विराट कोहलीनं (Virat Kohli) दमदार फलंदाजी केली. अफगाणिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं आक्रमक फलंदाजी करत शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीनं 55 चेंडूत शतक झळकावलं. तसेच विविध आंतरराष्ट्रीय विक्रम (International Record) मोडत एक नवा विक्रम आपल्या नावी नोंदवला. विराटच्या या अफाट कामगिरी नंतर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर (Instagram) एक विशेष पोस्ट केली आहे. ज्यात तिने विराटचे फोटो शेअर (Photo Share) केले असुन प्रत्येक गोष्टीसाठी मी कायम तुझ्याबरोबर असं कॅप्शन (Caption) दिलं आहे. अनुष्काच्या या पोस्ट विराटने रॉमिंटीक कमेंट (Romantic Comment) केली आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)