Anurag Kashyap Instagram Post: "मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख..."; अनुराग कश्यपची पोस्ट व्हायरल

अनुरागनं न्यू कमर्सबाबतीत तसेच त्याला भेटायला येणाऱ्या लोकांच्याबाबतीत एक खास पोस्ट शेअर केली आहे

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतोच तसेच तो बॉलीवुडमध्ये नव्या येणाऱ्यांना नेहमीच संधी देतो तसेच मार्गदर्शनही करतो. आता अनुरागनं न्यू कमर्सबाबतीत तसेच त्याला भेटायला येणाऱ्या लोकांच्याबाबतीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनुरागनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "मी न्यू कमर्सला मदत करण्याचा प्रयत्न करुन स्वत:चा बराच वेळ वाया घालवला आहे. ज्यांना वाटते की ते खूप क्रिएटिव्ह आहेत. त्यामुळे मी आता काही दर ठरवले आहेत.जर कोणाला मला भेटायचे असेल तर मी 10-15 मिनिटांसाठी एक लाख घेणार, अर्ध्या तासासाठी 2 लाख आणि 1 तासासाठी 5 लाख रुपये घेणार.

नेटकऱ्यांनी अनुरागच्या या हटके पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)