पैसे देऊनही Amitabh Bachchan यांना ट्विटरवर Blue Tick परत न मिळाल्याने बिग बी संतापले, भोजपूरी स्टाइलमध्ये काढला राग
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने गुरुवारी रात्री 12 वाजता लेगसी व्हेरिफाईड अकाऊंट्स म्हणजेच न भरलेल्या अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकले आहे. कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी आधीच याची घोषणा केली होती.
शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्ससह इतर स्टार्स आणि सेलिब्रिटींच्या ट्विटरवरून ब्लू टिक (Blue Tick) हटवण्यात आले आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने गुरुवारी रात्री 12 वाजता लेगसी व्हेरिफाईड अकाऊंट्स म्हणजेच न भरलेल्या अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकले आहे. कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी आधीच याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, 20 एप्रिलनंतर ज्या खात्यांनी पेड सबस्क्रिप्शन घेतलेले नाही, त्या खात्यांवरून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. दरम्यान ब्लू टीक हटवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी भोजपुरी स्टाईलने ट्वीटरला रिक्वस्ट केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)