Alia Bhatt Rewears wedding Saree: आलिया भट्ट ने लग्नातील Sabyasachi ची साडी पुन्हा नव्याने नेसत स्वीकरला नॅशनल अवॉर्ड; पहा फोटोज
आलियाने 'विनाकारण खरेदी करणं टाळत कपडे रिपीट करायला मी प्राधान्य' देते असं एका मुलाखती मध्ये सांगितलं होतं. आज त्याचं उदाहरण पहायला मिळालं.
आलिया भट्ट ने आज 'Gangubai Kathiawadi' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिल्लीत स्वीकारला आहे. या पुरस्कार सोहळ्यात आलिया तिच्या लग्नातील साडीत पुन्हा दिसली.आलिया-रणबीरच्या लग्नात तिने परिधान केलेली सब्यासाचीने डिझाईन केलेली सोनेरी रंगाची सुबक नक्षिकाम केलेली साडी आज पुन्हा नव्याने नेसली आहे. लग्नाच्या वेळीपेक्षा आज तिने फक्त वेगळ्या स्वरूपात ती साडी ड्रेप करून कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अनेकदा सेलिब्रेटी म्हटलं की त्यांच्या कपड्यांची, स्टाईलची चर्चा होते. पण यापूर्वी देखील आलियाने 'विनाकारण खरेदी करणं टाळत कपडे रिपीट करायला मी प्राधान्य' देते असं एका मुलाखती मध्ये सांगितलं होतं. आज आलियाने तिच्या पहिल्या नॅशनल अवॉर्ड स्वीकारण्याच्या वेळेस साडी रिपीट करत तो स्विकारला आहे. National Film Awards 2023 Winner: रॉकेट्री ठरली सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म; आलिया-क्रिती सेनन आणि अल्लू अर्जुनने पटकावलं विजेतेपद, वाचा संपूर्ण यादी .
पहा आलियाची आजची नॅशनल अवॉर्ड मधील हजेरी
आलियाचा लग्नातला लूक