Zee Cine Awards 2023 Winners: झी सिने अवॉर्ड्समध्ये आलिया आणि कार्तिकचे वर्चस्व; येथे पहा पुरस्कार विजेत्यांची यादी
या अवार्ड सोहळ्यात यावेळी आलिया, भट्ट, कार्तिक आर्यन आणि रश्मिका मंदान्ना यांचे आकर्षण पाहायला मिळाले.
Zee Cine Awards 2023 Winners: मनोरंजन विश्वासाठी कालची संध्याकाळ अनेक अर्थांनी खास होती. झी सिने अवॉर्ड्स 2023, सिनेप्रेमींसाठी सर्वात मोठा अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये स्टार्संचा मेळा भरला होता. रेड कार्पेटवर स्टार्संच्या आऊटफीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्तिक आर्यन, वरुण धवन, कियारा अडवाणी, पूजा हेगडे, रश्मिका मंदान्ना, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक स्टार्सनी ही संध्याकाळ रंगतदार केली. बोनी कपूर, विवेक अग्निहोत्री, राजकुमार संतोषी आणि अयान मुखर्जी यांसारखे चित्रपट निर्मातेही अवॉर्ड नाईटमध्ये सहभागी झाले होते. या अवार्ड सोहळ्यात यावेळी आलिया, भट्ट, कार्तिक आर्यन आणि रश्मिका मंदान्ना यांचे आकर्षण पाहायला मिळाले. विजेत्यांची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही.
झी सिने अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची यादी -
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): कार्तिक आर्यन, भूल भुलैया 2
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला): गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट
सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
दर्शकांची निवड सर्वोत्कृष्ट अभिनेता: अनुपम खेर, द काश्मीर फाइल्ससाठी
परफॉर्मर ऑफ द इयर पुरुष: वरुण धवन जुगजग जीयो आणि भेडियासाठी
परफॉर्मर ऑफ द इयर फिमेल: कियारा अडवाणी जुग्जग जीयो आणि भूल भुलैया 2 साठी
सर्वोत्कृष्ट पदार्पण: गुडबायसाठी, रश्मिका मंदान्ना
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरुष: अनिल कपूर, जुग्जग जीयो
Pic of the day 🤍✨#KartikAaryan #AliaBhatt #AnupamKher at Zee Cine Awards 2023 pic.twitter.com/G6C1B1DCrL
— Akshitha ❤️ (@kokiaaryanzfan) February 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2023 11:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

