अक्षय-सारा आणि धनुषच्या 'अतरंगी रे'ने केला विक्रम, Hotstarवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Tarun Adarsh) यांनी ट्विट करून या चित्रपटाची माहिती दिली आहे. यासोबतच या चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर करण्यात आले आहे.
अक्षय-सारा (Akshay Kumar) (Sara Ali Khan) आणि धनुषच्या(Dhanush) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अतरंगी रे' (Atarangi Re) या चित्रपटाची कथाही नावाप्रमाणेच 'अतरंगी' आहे. असे असूनही हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर (Hotstar) सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. जो रिलीज होताच नवीन रेकॉर्ड बनवत आहे. रिलीजच्या दिवशी हा चित्रपट पाहणाऱ्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Tarun Adarsh) यांनी ट्विट करून या चित्रपटाची माहिती दिली आहे. यासोबतच या चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर करण्यात आले आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)