Akshay Kumar ची आई मुंबईच्या रुग्णालयातील ICU मध्ये दाखल; अभिनेता ताबडतोब लंडनवरून आला परत

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे

Akshay Kumar | (Photo Credits: Twitter)

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अक्षय कुमारला याबाबत माहिती मिळताच अक्षय लंडनहून भारतात परतला आहे. अहवालानुसार, अक्षय कुमारच्या आईला मुंबईतील हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.  आयसीयूमध्ये दाखल होण्याचे नेमके कारण काय आहे याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर हे देखील सांगितले जात आहे की, अरुणा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now