Akshay Kumar ने दिल्लीत खास डान्सरसोबत केला जबरा डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.

Photo Credit - Twitter

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट अवघ्या काही दिवसांवर रिलीज होणार आहे. अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, प्रमोशनच्या निमित्ताने नुकताच तो टीमसोबत दिल्लीला पोहोचला होता. जिथे त्याने एका खास डान्सरसोबत स्टेज शेअर केला आणि जबरदस्त डान्स केला. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खिलाडीच्या चाहत्यांना तो चांगलाच आवडला आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर, आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now