Akhil Mishra Passed Away: 3 Idiots मधील अभिनेता अखिल मिश्रा यांचे निधन, 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 इडियटसह अखिल यांनी उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती आणि इतर सारख्या अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांत देखील काम केले होते.

आमिर खानच्या 3 इडियट्समध्ये लाइब्रेरियन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेता अखिल मिश्रा याचे हैदराबादमध्ये अपघाती निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होते. त्यावेळी बाल्कनीजवळ काम करत असताना ते एका उंच इमारतीवरून पडले. 3 इडियटसह अखिल यांनी उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती आणि इतर सारख्या अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांत देखील काम केले होते.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now