Allu Arjun: 'पुष्पा'च्या यशानंतर अल्लू अर्जुनचा 'हा' चित्रपट होणार हिंदी भाषेत प्रदर्शित

हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. पण, 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला लोकांनी भरभरून प्रेम दिल्याने निर्मात्यांनी 'आला वैकुंठपूररामुलू'चे हिंदी डब व्हर्जनही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

(Photo Credit - Twitter)

साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राईस' (Pushpa) हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. भारतात आतापर्यंत 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. दरम्यान, आता त्याच्या आगामी 'आला वैकुंठपुरामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) हा चित्रपट हिंदी भाषेत लवकरच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपट हिंदी मध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'अला वैकुंठापुरमुलु' 12 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. पण, 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला लोकांनी भरभरून प्रेम दिल्याने निर्मात्यांनी 'आला वैकुंठपूररामुलू'चे हिंदी डब व्हर्जनही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tweet

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement